जो विनाकारण घरातून बाहेर निघेल त्याची आता थेट गाढवावरून धिंड निघणार

बिड (प्रतिनिधी) : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. बीड जिल्ह्यातल्या टाकळी गावातल्या गावकऱ्यांनी तर नामी शक्कल लढवली आहे. यापुढे जो विनाकारण घरातून बाहेर निघेल त्याची आता थेट गाढवावरून धिंड निघणार आहे असा निर्णय गावकऱ्यांनी घेतलाय. एक वेळ विनाकारण बाहेर आढळून आल्यास पाचशे रुपये दंड तीन वेळा आढळून आला तर थेट गाढवावरुन धिंड असा निर्णय घेतल्यामुळे या गावाची चर्चा जिल्हाभर सुरू आहे, थेट गावात दवंडी देऊन या निर्णयाची सर्वांना माहिती देखील दिली आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून हा निर्णय घेतला असून गाव स्वच्छ ही केले आहे त्यामुळे या नियमाचे उल्लंघन करणार नाही असा विश्वासही गावच्या सरपंचांनी व्यक्त केलाय