मुंबई (प्रतिनिधी) : आदित्य ठाकरे यांच्या ट्वीटनंतर भाजपचे नेते, आमदार आशिष शेलार यांनी त्यांना उत्तर दिलं. खरंतर पालकमंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी तातडीने येण्याची गरज होती. किमान घटनेची खरी माहिती तरी घेणे अपेक्षित होतं. चार-पाच दिवसापूर्वी बांधकाम आणि नाका कामगार संघटनेने या परिसरात निदर्शने केली होती, ती निदर्शने सरकारने गांभीर्याने का घेतली नाहीत? सरकारने त्यां संघटनेशी चर्चा का केली नाही? त्यांची मागणी ही रेशनिंगचे धान्य आणि अन्न मिळावे हीच होती. मुंबईच्या विविध भागातून आज अचानक हजारो लोक रस्त्यावर जमा झाले. हे सरकार, गुप्तचर यंत्रणा, पोलिसांचे अपयश नाही का? नाका व बांधकाम कामगारांसाठी असणाऱ्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे देणे असलेली हक्काची मदत या कामगारांना अजून का मिळाली नाही ? ती फाईल कुठल्या डेबलवर का अडकली आहे? असे प्रश्न आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांना विचारले.
पालकमंत्री म्हणून आदित्य ठाकरेेंनी घटनास्थळी येण्याची गरज होती- आशिष शेलार