लॉकडाऊनमध्येच 'या' स्टार कपलच्या घरी आली नवी पाहुणी; पाहा फोटो


अभिनेत्री स्मृती खन्ना आणि गौतम गुप्ता दोघांच्या घरी एक नवा पाहुणा आला आहे. 15 एप्रिल रोजी स्मृतीने मुलीला जन्म दिला आहे.



इन्स्टाग्रामवर आपल्या फॅन्ससोबत गोड बातमी शेअर करत स्मतीने लिहिलं की, "आमची राजकुमारी आली आहे..15.04.2020".



याचसोबत तिने एक फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये हे जोडपं आपल्या घरी आलेल्या परीसोबत दिसत आहे.



स्मृतीच्या पोस्टवर अनेक फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत तिला अभिनंदन दिलं आहे. अभिनेत्री जीया मिर्झानेही कमेंट केली आहे. ती म्हणाली की, 'मी खूश आहे! ही सर्वात चांगली बातमी आहे. आपल्या परीला लवकरात लवकर भेटण्याची इच्छा आहे.'



अभिनेता अर्जुन बिजलानीने लिहिलं आहे की, 'तुम्हा दोघांसाठी खूप खुश आहे. आपल्या राजकुमारीला खूप प्रेम. पॅरेंट्सच्या गँगमध्ये तुमचं स्वागत आहे.'



स्मृती आणि गौतमने 2017मध्ये लग्न केलं होतं. या दोघांनी प्रसिद्ध मालिका 'मेरी आशिकी तुम से ही'मध्ये एकत्र काम केलं होतं.



सर्व फोटो स्मृति खन्नाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून घेतले आहेत.