महाराष्ट्रात कोरोनाचं सावट! राज्यात 283 नव्या रूग्णांची भर; कोरोना बाधितांचा आकडा 4483 वर

राज्यात 283 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. परिणामी राज्यातील आकडा 4483 वर गेला आहे. तर, राज्यातील सर्वाधिक रूग्ण मुंबई शहरात आहेत.



मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशातच आज सकाळी 11 वाजेपर्यंत राज्यात 283 नव्या रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 4483 वर पोहोचला आहे. यामध्ये सर्वाधिक 187 नवे रूग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर भिवंडीमध्ये एक, कल्याण-डोंबिवलीमध्ये 16, मिरा-भाईंदरमध्ये 7, नागपूर 1, नवी मुंबई 9, पनवेलमध्ये 6, पिपंरी-चिंचवडमध्ये 9, रायगड 2, सातारा 1, सोलापूर 1, ठाणे 21, वसई विरार 22 अशी 283 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. दरम्यान, राज्यातील दोन शहरं मुंबई आणि पुण्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून हा सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे.


 


महाराष्ट्र एकूण रूग्ण – 4483



  • मुंबई महानगरपालिका - 2911 (मृत्यू 132)

  • ठाणे - 41 (मृत्यू 2)

  • ठाणे महानगरपालिका- 110 (मृत्यू 2)

  • नवी मुंबई मनपा - 81 (मृत्यू 3)

  • कल्याण डोंबिवली - 85 (मृत्यू 2)

  • उल्हासनगर - 1

  • भिवंडी, निजामपूर - 6

  • मिरा-भाईंदर - 78 (मृत्यू 2)

  • पालघर - 17 (मृत्यू 1 )

  • वसई- विरार - 118 (मृत्यू 3)

  • रायगड - 15

  • पनवेल - 33 (मृत्यू 1)

  • नाशिक - 4

  • नाशिक मनपा - 5

  • मालेगाव मनपा - 78 (मृत्यू 6)

  • अहमदनगर - 21 (मृत्यू 1)

  • अहमदनगर मनपा - 8

  • धुळे -1 (मृत्यू 1)

  • जळगाव - 1

  • जळगाव मनपा - 2 (मृत्यू 1)

  • पुणे - 17 (मृत्यू 1)

  • पुणे मनपा - 546 (मृत्यू 49)

  • पिंपरी-चिंचवड मनपा - 57 (मृत्यू 1)

  • सातारा - 12 (मृत्यू 2)

  • सोलापूर मनपा - 16 (मृत्यू 2)

  • कोल्हापूर - 3

  • कोल्हापूर मनपा - 3

  • सांगली - 26

  • सिंधुदुर्ग - 1

  • रत्नागिरी - 6 (मृत्यू 1)

  • औरंगाबाद मनपा - 30 (मृत्यू 3)

  • जालना - 1

  • हिंगोली - 1

  • परभणी मनपा - 1

  • लातूर - 8

  • उस्मानाबाद - 3

  • बीड - 1

  • अकोला - 7 (मृत्यू 1)

  • अकोला मनपा - 9

  • अमरावती मनपा - 6 (मृत्यू 1)

  • यवतमाळ - 14

  • बुलढाणा - 21 (मृत्यू 1)

  • वाशिम - 1

  • नागपूर - 2

  • नागपूर मनपा - 67 (मृत्यू 1)

  • चंद्रपूर मनपा - 2

  • गोंदिया - 1

  • इतर राज्ये 13 (मृत्यू 2)