राजा शिवाजी

तसं पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांवर आजवर बरंच लिखान झालं आहे. कादंबया, नाटके, तमाशे, गाणी, पोवाडेइतिहास, चरित्रे इ. वाड्:मयाचे जेवढे म्हणून प्रकार आहेत, त्या सर्व वाड्:मय प्रकारात शिवाजी आणि शिवकाल हा विषय अनेक वेळा येऊन गेला आहे. चित्रपटही निघालेत, व्याख्यानेही खूप झालीत आणि होत आहेत. पण एवढ सारं होऊनही शिवकालाची, शिवाजी महाराजांची आणि त्यांच्या कार्यास प्रेरणा ठरलेल्या कारणांची जी प्रतिमा सामान्य जनमानसात निर्माण झाली आहे ती इतिहासाशी इमान असलेली प्रमिा आहे, असे म्हणवंत नाही. लोकशाहीत गजा खरं म्हणजे सरंजामशाही आणि राजेशाही ही कालबाह्य झालेली समाजरचना आहे. शिवाजीचा काळ हा सरंजामशाहीचा काळ होता आणि शिवाजी हा सुध्दा एक सरंजामशाहीतलाच राजा होता. जगाने आणि आपल्या देशाने राजेशाही त्याज्य ठरवले. राजेरजवाडे नाहीसे व्हावेत म्हणून संघर्ष केले, राजेरजवाडे नाहीसे केले आणि हे सुध्दा बरच केलेशिवाजीने स्थापन केलेल्या राज्याचे शिवाजीनंतर जे काही झाले त्यावरुनसुध्दा राजेशाही स्वीरकरण्याजोगी व चालू ठेवेण्याजोगी समाजव्यवस्था नव्हती, हेच सिध्द होते. प्रगत अशा ब्रिटीश भांडवलशाहीसाम्राज्यशाहीसमोर भारतातील सरंजामशाही टिकाव धरु शकली नाही. यावरुनसुध्दा सरंजामशाही व राजेशाही टाकाऊ समाजव्यवस्था ठरते हेच पुन्हा दिसते. पण मग या आधुनिक लोकशाहीत एका राजाचा उदो उदो का व्हावा ? त्या राजाच्या विचारांत, व्यवहारांत आणि चरित्रात असे काय आहे की त्यामुळे लोकशाहीतसुध्दा त्याचे स्मरण स्फुर्तिदायक ठरावे ? तसे राजे खूप होऊन गेले. सर्व राजांची काही अशी आठवण केली जात नाही. त्या राजांच्या जयंत्या किंवा मयंत्या कुणी साजया करीत नाही. त्या त्या राजांचे जे कुणी वारस हयात असतील कदाचित करीत असतील. त्या राजांच्या समाविष्ट असेलेल्या प्रदेशातील काही लोक कठे कठे असे करीत असतली. परंतू शिवजयंती जितक्या विस्तृत प्रदेशात. जितक्या मोठ्या प्रमाणात आणि ज्या उत्साहाने, उमेदीने व स्फूर्तीने साजरी केली जाते तसे इतर कुणाही राजाच्या बाबतीत उघड नाही. असे का व्हावे ? इतर राजांपेक्षा या राजात काय वेगळेपण होते की ज्यामूळ असे घडत आले आहे ? शिवकालीन किंवा त्याच्या आगेमागे होऊन गेलेल्या इतर राजांपेक्षा शिवाजीत असे काय वेगळेपण होते ? हे वेगळेपण समजावून घेतलं तर शिवकालाचा व शिवचरित्राचा नीट उलगडा होईल. राज्य-संस्थापक पहिली गोष्ट म्हणजे शिवाजी हा कुणी अगोदर तयार केलेल्या गादीवर वारसा हक्काने बसलेला आयतोबा नव्हता. आयत्या पिठावर रेघोट्या उठचणे सोपे असत. असते. त्यात फारसे कौतुकास्पद काही नसते. वारसा हक्काने राजे बनललअनक हाऊन गल. शिवाजी वारसा हक्काने राजा बनला नव्हता. त्याने राज्य निर्माण केले. तो राज्य-संस्थापक होता. राज्य निर्माण करणे सोपे नव्हते नसते. शिवाजीने ते केले. इतरांनी स्थापलेल्या राज्यावर बसणे आणि स्वकर्तृत्वावर राज्य निर्माण करणे यात खूप फरक आहे.