अशोक चव्हाण याना दणका

मुंबई (हुसेन शेख): राज्यातील वादग्रस्त आदर्श घोटाळ्याच्या खटल्यातून नाव वगळण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांची दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. या खटल्यातून नाव वगळण्यास न्यायालयाने नकार दिला असल्याने चव्हाण यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आदर्श खटल्यातून आपले नाव वगळण्यासाठी चहाण यांनी यापीठी याचिका केली होती. ती फेटाळल्यानंतर त्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागितली. मंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम.एल.टहलियानी यांनी त्यांचा अर्ज फेटाळला. यामुळे चव्हाण यांना भ्रष्टाचार प्रतिबंधक विरोधी कायद्यानुसार खटल्याला सामोरे जावे लागणार आहे. आदर्श सोसायटी प्रकरणात त्यांच्यावर पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप ठेवला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे अशोक चव्हाण यांच्या विरोधात दाखल झालेल्या आरोपपत्रावरुन विशेष सीबीआय न्यायालयाने पुढील निर्णय घ्यायचा आहे. आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात १३ आरोपींपैकी अशोक पीपैकी अशोक चव्हाण एक आहेत.पण, उच्च न्ययालयाच्या या निर्णया वीरोधात चव्हाण यांना सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याची परवानगी दिली आहे, असे न्या. टहलियाना यांनी स्पष्ट केले.