सर्वसामान्यांना पेट्रोल बंदी तरीही बीडमध्ये पेट्रोल पंपावर तोबा गर्दी

बीड (प्रतिनिधी) : जिल्ह्यामध्ये केवळ जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या वाहनांना पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा केला जाईल, असा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला होता. मात्र आजही अनेक पेट्रोल पंपावर लोक अगदी रांगेत उभे राहून पेट्रोल भरत असल्याचे चित्र पाहायला मिळते. माजलगाव शहरातील भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर नागरिकांची गर्दी झाली आहे. यासोबतच दिंद्रूडमध्ये सुद्धा पेट्रोल पंपावर सोशल डिस्टन्सिंग न पाळता लोक पेट्रोल पंपावर गर्दी करत आहेत. देशात लॉकडाऊन असल्यामुळे कुठल्याही व्यक्तीने अनावश्यक घराच्या बाहेर फिरायचे नाही म्हणूनच बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सर्वसामान्य व्यक्तींना पेट्रोल बंदीचा निर्णय बीड जिल्ह्यासाठी घेतला होता. मात्र लोकांनी या निर्णयाला हरताळ फासण्याचे चित्र पाहायला मिळत आहे.