मुंबई (रामेश्वर दवंडे): गोवंश हत्याबंदी विधेयकाला १९ वर्षांनंतर राष्ट्रपातीनी मंजूरी दिली असून या विधेयकाची राज्यात कडक अंमलबजावणी केली जाईल. भाकड गायीसंदर्भात व्यक्त केलेली चिंता निराधार असून या गायींच्या संवर्धनासाठी गो ग्राम योजनेअंतर्गत राज्य व केंद्र सरकार निधी उपलब्ध | करुन देणार असल्याची माहित पशुसंवर्धन मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.राज्य सरकारने गो ग्राम योजना तयार केली असून या ग्राममध्ये प्रत्येकी १ हजार गायींच संवर्धन केले जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकार जमीन व चा-यासाठी निधी उपलब्ध करुन देईल. गायींच्या संवर्धनासाठी अनेक जैन संघटना तसेच स्वयंसेवी संस्थाही पुढे आल्या आहेत. त्यांनी स्वखर्चाने गोवंश संवर्धनाची जाबादरी उचलण्याची तयारी दाखविली आहे. त्यांनी देखील राज्य सरकार परवानगी देईल. त्यांना लीजने जमीनही उपलब्ध करुन दिली जाणार असल्याने एकनाथ खडसे म्हणाले. मुंबईत मोफत वायफाय सविधा
गोवंशहत्याबंदी विधेयकाची कडक अंमलबजावणी- खडसे