अण्णा हजारे याना ठार मारण्याचीफेसबक धमकी कॅनडातील भारतीयाचीपोस्ट

 मुंबई (रामेश्वर दवंडे): ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना फेसबुकवर ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. कॅनडात राहणारा भारतीय व्यक्ती गगन विधू याने ही धमकी दिली | असल्याचे निष्पन्न झाले आहे. या संदर्भात हजारे यांनी ठाणे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तसेच राज्याच्या पोलिस महासंचालकांना पत्रही देण्यात आले आहे.अण्णा हजारे यांना ठार करण्याची वेळ आली आहे. मी लवकरच पुढचा नथुराम गोडसे होईन अशी पोस्ट २४ पेब्रुवारी रोजी दुपारी अण्णा हजारे यांच्या फेसबुक अकाऊंटला आली. या पोस्टला | तीन लाईक्स मिळाल्या.मी गंमत करत नाही. लवकरच मी भारतात येणार आहे. मी या आधुनिक गांधीला मारण्यासाठी बंदुकीची व्यवस्था केली आहे, मी केजरीवालची घृणा करतो, त्याला हानी पोहोचवण्यसाठी मी काहीही करु शकतो, अशी पोस्ट त्याने पुन्हा २५ फेब्रुवारीला टाकली.मी सर्व कागदपत्रे जमा केली आहेत. नवी दिल्ली येथील माझा मित्र नील | यावर काम करत आहे. केजरीवाल ला आम्ही लवकरच उघडा पाडणार आहोत, त्यानंतर मी नथुराम गोडसेची भूमिका करणार आहे. मी गंमत करत नाही. मी खूप गंभीर आहे. माझ्या भारतमातेसाठी मी काहीही करु शकतो, असे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे.