मुंबईकरांना मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करुन देण्याची घोषणा शिवसेनने केली हेती. माजी महापौर सुनील प्रभू त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मध्यंतरी दादर शिवाजी पार्क परिसरात या विषयावर शिवसेना-मनसे हे दोन पक्ष आमने सामने आले होते. भाजपा युवा मोर्चाने आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर मंबई भाजपा अध्यक्ष शेलार यांच्या नेतृत्वाखाली याच विषयाला हात घातला आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेवून मुंबईत मोफत वायफाय सुविधा होण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मागणी केली.
मुंबईत मोफत वायफाय सविधा