कल्याण (प्रतिनीधी): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुजराती प्रेम नवे नाही. पण, भाजपातील बांधकाम व्यावसायिक पदाधिका- यांचे ९ गुजराती शाळा बळकावण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. महापालिकेच्या अखत्यारित येणा-या या शाळेचा भूखंडाला सोन्याचा भाव असताना ती गिळंकृत करण्याचा डाव विरोधी पक्षनेते विश्वनाथ राणे यांनी हाणून पाडला आहे. विशेष म्हणजे या शळेबाबत सत्ताधा-यांना फारशी माहिती नसल्याची बाब पुढे आलेली आहे. १९३५ पासून शंकरराव ला चौकात ही गुजराती शाळा सुरु होती. १९९४ रोजी जिल्हा परिषदेच्या ज्या १०२ प्राथमिक शाळा महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आल्या होत्या त्यात या शाळेचाही समावेश होता. ती पटसंख्या कमी असल्याचे कारण पुढे करत ही शाळा बंद करण्यात आली आहे. सध्या शाळा बंद अवस्थेत असल्याने शाळेच्या मागच्या बाजूला महापालिकेतील चतुर्थश्रेणीचे कर्मचारी राहत आहेत.
गुजरातोशाळा हडप ला करण्याचा डाव फसला